मंदिरांचे महात्म्य :-

तुळजा वराचे निगुणे। रामे रावण मारिला ।।
अहो ही तुळजा भवनी। प्रासिद्ध रामवरदायिनी।।

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी वर्णन केल्याप्रमाणे प्रभु श्रीरामचंद्रांना वर देणारी श्रीरामवरदायिनी म्हणजे तुळजाभवनी मातेचे एक रूप अशी मान्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेची अनेक देवस्थाने आहेत. परंतु श्रीरामवरदायिनी आईचे मुळ हेमाडंपंथी पुरातन मंदिर महाराष्ट्रातील सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या पश्चिमेकडे वसलेल्या श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) येथे आहे. हे देवस्थान महाबळेश्वरपासून केवळ २० कि.मी. अंतरावर, तर प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे.

या मंदिराच्या गाभा-यामध्ये सिंहासनावर दोन मुर्ती विराजमान आहेत. त्यापैकी एक महाबळ दैत्यचा पराभव करण्यासाठी प्रकटलेली "श्री वरदायिनी" तर दुसरी श्रीरामाला वर देणारी "श्रीरामवरदायिनी" या नावाने प्रसिध्द आहेत. मुख्य मंदिराच्या शेजारीच श्री केदारेश्वराचे भव्य व प्राचीन मंदिर आहे. तसेच मानाई, झोलाई, वाघजाई व देशमानाई मातेची छोटी मंदिरे मंदिर परिसरामध्ये आहेत. मंदिराचा मुख्य दरवाजा पुर्व दिशेला आहे. मुख्य सभामंडपाच्या समोरच एक मोठे व प्राचीन झाड असून त्यावर यात्रे दरम्यान बगाड फिरवण्याची प्रथा आहे.

श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठतील एक जागॄत शक्तीपीठ आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व हिंदू - मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची ही कुलदैवत आहे. तरी भक्ताने एकदातरी या देवस्थानला भेट देवून मातेची प्राचिती घ्यावी.

कार्यक्रम क्लिक करा»
देव देवतांनो या । संत सज्जनांनो या ।। भक्त भाविकांनो या । माय भगिनींनो या ।। आई श्रीरामवरदायिनीच्या यात्रोत्सवास अवघे अवघे या ।। श्रीरामवरदायिनीच्या यात्रेस येणा-या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत

.
जाहिरात
  • जाहिरात
माहिती

यात्रा उत्सव २५/०४/२०१७ ते ०१/०५/२०१७

नवरात्र उत्सव २१/०९/२०१७ ते ३०/०९/२०१७


मंदिराची वेळ:
सकाळी ०७:३० ते संध्याकाळी ०६:३०
दर्शनांस खुले राहिलं
** मंदिर दुपारी ०१:०० ते ३:०० बंद राहील **

अभिषेकाची वेळ:
सकाळी ०७:३० ते सकाळी ०९:००


आरतीची वेळ:

सकाळी ११:०० वाजता
संध्याकाळी ०७:०० वाजतासंपर्क : आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा

दूरध्वनी: (०२१६८) २४९०१३


आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण,

पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
ई मेल: adishakti11@yahoo.com